पुणे, १५/०७/२०२३: बँकेत नोकरीच्या आमिषाने सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रोहन सुनील बुळे (वय २५), अविनाश रुकारी (दोघे रा. काेल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार स्वारगेट भागातील महर्षीनगर परिसरात राहायला आहेत. तक्रारदाराची परिचतामार्फत आरोपी रोहन आणि अविनाश यांच्याशी ओळख झाली होती. आरोपींनी तक्रारदाराच्या मुलास एका नामांकित बँकेत लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते.
तक्रारदाराकडून वेळोवेळी सहा लाख रुपये आरोपींनी घेतले. मुलास नोकरी न मिळाल्याने त्यांनी आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक कारके तपास करत आहेत.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?