पुणे, १६/०७/२०२३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे हडपसर भागातील जनसंपर्क कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकासह तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यालयाजवळील सायकल आगीत जळाली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणात तीनजणांनी आग लावल्याचे आढळून आले आहे. हडपसर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचे सृजन हाऊस इमारतीत जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांच्या या कार्यालयात शनिवारी मध्यरात्री तिघांनी प्रवेश करुन आग लावली. आगीत एक सायकल जळाली आहे. कार्यालयाला आगीची झळ पोहोचली आहे.
More Stories
‘विधिमंडळात तळागाळातील जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंब हवे’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राहुल सोलापूरकरसारखी वृत्ती ठेचलीच पाहिजे: सुनील तटकरे यांची टीका
‘राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे अराजकतावाद्यांना बळ’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप