December 2, 2025

पुणे: येरवड्यात गांजा तस्कराला अटक, अमली पदार्थ विरोधी दोन पथकाची कारवाई

पुणे, दि. २८/०७/२०२३: गांजा तस्करीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने येरवडा परिसरात अटक केली आहे. त्याच्याकडून १० किलो गांजा, मोबाईल, असा दोन लाखांवर ऐवज जप्त केला आहे. सोनू साहेबराव कोळसे, वय 44 रा. श्रीरामपूर जि.नगर असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संदीप शेळके यांना गांजा तस्कराची माहिती मिळाली . पथकाने येरवडा स्मशानभूमी जवळ गांजा विक्री साठी आलेल्या सोनूला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 9 किलो 935 ग्रॅम गांजा , मोबाईल जप्त केला. ही कामगिरी उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सतीश गोवेकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक. सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके. दिगंबर चव्हाण, योगेश मांढरे. प्रशांत बोमादंडी. महेश साळुंखे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संदीप जाधव यांनी केली

गांजा विक्री करणारा जेरबंद

कॉलेजमधील तरुण तरुणींना तसेच टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या एकाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. गणेश देविदास कसबे, वय २२ रा.आंबील ओढा, दांडेकर पुलाजवळ, दत्तवाडी असे अटक केलेल्याचे नाव आहे.
आरोपिकडून १४ हजारांचा ७०२ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या मिळुन आला. ही कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक . विपीन हसबनीस, पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक महेश भोसले, उपनिरीक्षक संदिप जाधव, उपनिरीक्षक दत्तात्रय सावत पोलीस अंमलदार शिंदे, गभाले, पाथरुट, माळी, आल्हाट, गायकवाड, काळे यांनी केली