पुणे, दि. ३/०९/२०२३: पीएमपीएल बस वाहकाला टेम्पो चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना १ सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास वारजे परिसरातील चांदणी चौकाकडे जाणार्या रस्त्यावर घडली.याप्रकरणी समाधान देवकर (वय १९ रा. अंबरनाथ, ठाणे ) याने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान हा पीएमपीएल बस वाहक असून १ सप्टेंबरला वारजे परिसरात जाणार्या बसमध्ये कार्यरत होता. त्यावेळी टेम्पो चालकाने बसला ओव्हरटेक केल्याने समाधानने बाहेर पाहिले. त्यामुळे रागाने पाहिल्याचा गैरसमज निर्माण झाल्याने टेम्पो चालकाने समाधानच्या डोक्यात लोखंडी स्टीलने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ओलेकर तपास करीत आहेत.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?