April 29, 2024

पीएमआरडीच्या हद्दीसाठी पीएमपीएल चा दैनंदिन पास 120 रुपयांना

पुणे 3 सप्टेंबर 2023: पुणे महानगर परिवहन महामंडळाने संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये पीएमआरडीएतील हद्दीसाठी दैनंदिन पासची सेवा सुरू केली आहे एका दिवसासाठी 120 रुपयांचा पास तर मासिक पास 2700 करण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी केवळ पुणे महापालिका हद्द आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्द यासाठी अनुक्रमे 40 रुपये आणि 50 रुपयांचा पास होता आता ही नवीन सेवा सुरू केली आहे
पीएमपीएल पाससाठी प्रवाशांनी परिवहन महामंडळाचे जवळच्या पास केंद्रावर जाऊन आधार कार्डची झेरॉक्स प्रत व फोटो देऊन प्रवाशी ओळखपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. तसेच दैनिक पाससाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र बसमधील वाहकाला दाखवून वाहकाकडून दैनिक पास घेता येईल.

पीएमआरडीए संचलन क्षेत्रातील नोकरदार, महिला व लोकप्रतिनिधी यांनी पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांकरीता पूर्वीच्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी असलेल्या पासच्या दरात काही प्रमाणात दरवाढ करून पूर्वीप्रमाणेच दैनिक पास व मासिक पास सुरू करणेबाबत वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे.
त्यास अनुसरून पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास. १२० रुपयै व मासिक पास २७०० रुपयांचा असणार आहे.

तरी जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता सुरू करण्यात येत असलेल्या दैनिक व मासिक पास सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.