September 23, 2025

एमएसएलटीए ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अवनीश चाफळे, अर्जुन किर्तने, स्वानिका रॉय यांची आगेकुच

पुणे, 6 सप्टेंबर, 2023: ग्रँड स्लॅम टेनिस अकादमीच्या वतीने आयोजित व एमएसएलटीए, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात स्वानिका रॉय हिने तर, मुलांच्या गटात अवनीश चाफळे, अर्जुन किर्तने यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकीत अवनीश चाफळे याने चौथ्या मानांकित नीरज रिंगणगावकरचा 1-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. पुण्याच्या सातव्या मानांकित अर्जुन किर्तनेने दुसऱ्या मानांकित मनन अगरवालचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(1) असा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला. अव्वल मानांकित विश्वजीत सणस याने शार्दुल खवलेचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित स्वराज ढमढेरेने आठव्या मानांकित नील केळकरला 7-5, 6-3 असे पराभूत केले.

मुलींच्या गटात बिगरमानांकीत स्वानिका रॉय हिने तिसऱ्या मानांकित वरा ईश्वरचे आव्हान 6-2, 6-2 असे संपुष्टात आणले. काल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या रिशिता पाटीलने आरोही देशमुखला 6-3, 6-4 असे पराभूत केले. अव्वल मानांकित श्रेया पठारेने सातव्या मानांकित ईशा मोहितेचा 6-2, 6-2 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली. दुसऱ्या मानांकित ध्रुवी अध्यांत्याने श्रावणी देशमुखचे आव्हान 6-3, 6-4 असे मोडीत काढले.

दुहेरीत मुलींच्या गटात श्रावणी देशमुख व श्रावी देवरे यांनी भक्ती ताजने व निशिता देसाई या चौथ्या मानांकित जोडीचा 6-2, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. मूळच्या गटात शार्दुल खवलेने अर्णव बनसोडेच्या साथीत चौथ्या मानांकित नीरज रिंगणगावकर व अवनीश चाफळे यांचा 6-2, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी:
विश्वजीत सणस(1)वि.वि.शार्दुल खवले 6-1, 6-2;
अवनीश चाफळे वि.वि.नीरज रिंगणगावकर(4)1-6, 6-2, 6-3;
स्वराज ढमढेरे(3)वि.वि.नील केळकर(8)7-5, 6-3;
अर्जुन किर्तने (7)वि.वि.मनन अगरवाल(2) 6-3, 7-6(1);

मुली:
श्रेया पठारे (1)वि.वि.ईशा मोहिते (7)6-2, 6-2;
स्वानिका रॉय वि.वि.वरा ईश्वर(3)6-2, 6-2;
रिशिता पाटील वि.वि.आरोही देशमुख 6-3, 6-4;
ध्रुवी अध्यांत्या(2)वि.वि.श्रावणी देशमुख 6-3, 6-4;

दुहेरी: मुली:
श्रेया पठारे/आर्या शिंदे(1)वि.वि.वैष्णव नागोजी/क्रिती व्होरा 6-0, 6-1;
श्रावणी देशमुख/श्रावी देवरे वि.वि.भक्ती ताजने/निशिता देसाई(4) 6-2, 6-4;
शिबानी गुप्ते /काव्या देशमुख(3)वि.वि.आरोही देशमुख/रिशीता पाटील 6-4, 7-5;
ईशा मोहिते/ध्रुवी अध्यांत्या(2)वि.वि.स्वरा जावळे/संयुक्ता पगारे 6-1, 6-1;

मुले:
विश्वजीत सणस/स्वराज ढमढेरे(1)वि.वि.रोहन बजाज/अर्जुन आदित्य 6-3, 6-2;
शार्दुल खवले/अर्णव बनसोडे वि.वि.नीरज रिंगणगावकर/अवनीश चाफळे(4) 6-2, 7-5;
वरद पोळ/अर्जुन परदेशी वि.वि.सूर्या काकडे/ओमेश औटी 6-0, 7-5;
नील केळकर/मनन अगरवाल(2)वि.वि.क्रिशांक जोशी/वरद उंद्रे 6-3, 6-2.