May 13, 2024

डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्येला तिहेरी मुकुट

पुणे, 5 सप्टेंबर 2023 ः पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्ये याने 17, 19 वर्षाखालील व पुरूष तीन गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला., तर मुलींच्या गटात राधिका सकपाळ हिने 17 वर्षांखालील व महिला या दोन गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट पटकावला.
पीवायसी क्‍लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटात अंतिम फेरीत पाचव्या मानांकित राधिका सकपाळने सई कुलकर्णीचा 12-10, 11-05, 11-05, 11-06 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. राधिका ही अशोका विद्यालय मध्ये विज्ञान शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून भुषण ठाकुर हाय परफॉर्मन्स सेंटर येथे प्रशिक्षक भुषण ठाकुर  यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
पुरुष गटात अंतिम लढतीत  सातव्या मानांकित नील मुळ्येने अव्वल मानांकित आदित्य जोरीचा 11-09, 12-10, 11-06, 11-08 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. नील हा डॉ.कलमाडी हायस्कूल मध्ये अकरावी ईयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित शौरेन सोमणने दुसऱ्या मानांकित कौस्तुभ गिरगावकरचा 05-11, 11-01, 11-04, 04-11, 12-10 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. शौरेन हा सिंबायोसिस शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून एम्स टेबल टेनिस अकादमी मध्ये प्रशिक्षक नीरज होनप यांच्या मार्गर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित रुचिता धारवाटकरने चौथ्या मानांकित तनया अभ्यंकरचा 08-11, 11-02, 07-11, 11-06, 11-04 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 13 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित  श्रेयस माणकेश्वरने दुसऱ्या मानांकित अली कागदीचा 11-06, 11-07, 13-11 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित आद्य गावत्रे हिने चौथ्या मानांकित मृदुला सुरवसचा 11-08, 12-10, 05-11, 11-09 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
प्रौढ 40 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित ओंकार जोग याने अव्वल मानांकित संतोष वक्राडकरचा 07-11, 11-03, 11-07, 11-07 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. स्पर्धेत नील मुळ्ये याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांना खेळाडूंना पदके व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे विद्या मुळ्ये, पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, टेबल टेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे, पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे स्पर्धा संचालक अविनाश जोशी, दिपेश अभ्यंकर, राहुल पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 15 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
शौरेन सोमण(1) वि.वि.आदित्य सामंत(4) 11-05, 11-08, 11-07;
कौस्तुभ गिरगावकर(2)वि.वि.श्रेयस माणकेश्वर 11-09, 12-10, 11-09;
अंतिम फेरी: शौरेन सोमण(1)वि.वि.कौस्तुभ गिरगावकर(2) 05-11, 11-01, 11-04, 04-11, 12-10;
15 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
तनया अभ्यंकर(4) वि.वि.पलक जसवानी 09-11, 05-11, 11-07, 11-07, 12-10;
रुचिता धारवाटकर(2) वि.वि.सई कुलकर्णी(3) 07-11, 11-09, 06-11, 11-05, 11-06;
अंतिम फेरी:
रुचिता धारवाटकर(2) वि.वि.तनया अभ्यंकर(4) 08-11, 11-02, 07-11, 11-06, 11-04:
13 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
श्रेयस माणकेश्वर(1) वि.वि.मोहिल ठाकूर(5) 11-13, 11-03, 11-05, 11-07;
 अली कागदी(2) वि.वि.राजस भावे(6) 09-11, 11-07, 11-08, 11-06, 11-08;
अंतिम फेरी: श्रेयस माणकेश्वर(1)वि.वि.अली कागदी(2) 11-06, 11-07, 13-11;
13 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
आद्य गावत्रे(2) वि.वि.दिया शिंदे 09-11, 11-05, 11-07, 11-08;
 मृदुला सुरवसे(4)वि.वि.कलिका आठवले 11-03, 09-11, 11-01, 11-08;
अंतिम फेरी: आद्य गावत्रे(2) वि.वि.मृदुला सुरवसे(4) 11-08, 12-10, 05-11, 11-09;
पुरुष: उपांत्य फेरी:
आदित्य जोरी(1) वि.वि.ओंकार जोग(4) 16-14, 11-07, 08-11, 11-06, 11-07;
नील मुळ्ये(7)वि.वि.भार्गव चक्रदेव(3) 11-09, 11-08, 11-06, 11-08;
अंतिम फेरी: नील मुळ्ये (7) वि.वि.आदित्य जोरी(1) 11-09, 12-10, 11-06, 11-08;
महिला: उपांत्य फेरी:
राधिका सकपाळ(5) वि.वि.वैष्णवी देवगडे 11-07, 11-05, 11-05, 11-07;
सई कुलकर्णी वि.वि.रुचिता धारवाटकर 07-11, 11-09, 07-11, 11-05, 11-07, 08-11, 12-10;
अंतिम फेरी: राधिका सकपाळ(5) वि.वि.सई कुलकर्णी 12-10, 11-05, 11-05, 11-06;
प्रौढ 40 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
संतोष वक्राडकर(1) वि.वि.नहुष दांडेकर 11-05, 11-07, 11-08;
ओंकार जोग(3) वि.वि.दीपक कदम 11-06, 09-11, 10-12, 11-06, 11-09;
अंतिम फेरी: ओंकार जोग(3)वि.वि.संतोष वक्राडकर(1) 07-11, 11-03, 11-07, 11-07.