पुणे, दि. २४/०९/२०२३: जीवे मारण्याची धमकी देत तिघा चोरट्यांनी जेष्ठ दाम्पत्याच्या घरातून १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. महिलेच्या गळ्यातील दागिने काढताना चोरट्यांनी तिला दुखापत केली आहे. ही घटना २३ सप्टेंबरला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर परिसरातील शेवाळेवाडी कोद्रेनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ दाम्पत्याच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची शेवाळेनगर परिसरात दोनमजली इमारत असून त्याठिकाणी त्यांचे आई-वडील राहतात. २३ सप्टेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास तिघा चोरट्यांनी स्वयंपाक घराच्या खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी जेष्ठ दाम्पत्याला हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील ५५ हजारांची रोकड आणि जेष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या असा १ लाख ३५ हजारांच्या ऐवज चोरून नेला. दरम्यान, चोरट्यांनी महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढताना त्यांना जखमी केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन