पुणे, दि. 4 ऑक्टोबर 2023 : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे पुण्याची 16 वर्षाखालील गटातील राष्ट्रीय विजेती आस्मी आडकर आणि 12 वर्षाखालील गटातील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील विजेता स्मित उंद्रे यांसह 2021-22 या कालावधीत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांतील मानांकित खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
पुणे जिल्ह्यांतील आस्मी आडकर व स्मित उंद्रे यांना अरूण वाकणकर मेमोरियल करंडक देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे वितरण अपर्णा वाकणकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीए मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, खजिनदार कौस्तुभ शहा, डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात वार्षिक मानांकन यादीत विविध वयोगटात अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना आयकॉन ग्रुपच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच, जिल्ह्यातील टेनिस ऑफिशियल यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावर्षी प्रशिक्षक नंदू रोकडे यांच्या वतीने पुण्यातील प्रशिक्षक रवींद्र पांडे, अतुल देवधरे आणि कपिल किन्नरी यांना बेस्ट कोचेस ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय अहान भट्टाचार्य, आदित्य उपाध्ये, रेयांश गुंड, समायरा ठाकूर, झिया सैफी, इश्ना नायडू, अद्वैत गुंड, ऋषभ ए, देव मूर्ती, देवेशी पडिया, जान्हवी सावंत, वान्या अग्रवाल, आश्रित माज्जी, सय्यम पाटील, आहान पाटील, प्रार्थना खेडेकर, सारा फेंगसे, ओवी मारणे, सक्षम भन्साळी, सनत कडले, स्वर्णिम येवलेकर, प्रार्थना खेडेकर, परी हेंगले, काव्या देशमुख या खेळाडूंना पदक, प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील 100 हुन अधिक प्रशिक्षक, खेळाडू, पालक मोठ्या संख्येने या पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थित होते.
2021-2022मधील यशस्वी कमगिरीबद्दल सत्कार केलेल्या खेळाडूंची यादी:
8 वर्षाखालील मुले: 1. अहान भट्टाचार्य, 2. आदित्य उपाध्ये, 3.रेयांश गुंड
8 वर्षांखालील मुली: 1. समायरा ठाकूर, 2.झिया सैफी, 3.इश्ना नायडू
10 वर्षांखालील मुले: 1.अद्वैत गुंड, 2.ऋषभ ए, 3.देव मूर्ती
10 वर्षांखालील मुली: 1. देवेशी पडिया, 2.जान्हवी सावंत, 3.वान्या अग्रवाल
12 वर्षाखालील मुले: 1. आश्रित माज्जी, 2.सय्यम पाटील, 3.आहान पाटील
12 वर्षांखालील मुली: 1.प्रार्थना खेडेकर, 2.सारा फेंगसे, 3.ओवी मारणे
14 वर्षांखालील मुले: 1.सक्षम भन्साळी, 2.सनत कडले, 3.स्वर्णिम येवलेकर
14 वर्षांखालील मुली: 1.प्रार्थना खेडेकर, 2.परी हिंगले, 3.काव्या देशमुख.
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक: अतुल देवधरे, कपिल किन्नरी व रवींद्र पांडे.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय