May 18, 2024

भारती विद्यापीठ एमएसएलटीए डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत पावक हरीणकुमार, सनत कडले यांची आगेकूच

पुणे, 3 ऑक्टोबर 2023: संदीप किर्तने टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित भारती विद्यापीठ एमएसएलटीए डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात पावक हरिणकुमार, सनत कडले यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकीत पावक हरीणकुमार याने तिसऱ्या मानांकित स्मित उंद्रेचा 6-0, 6-4 असा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला. सनत कडलेने सातव्या मानांकित अर्णव भाटियाकॅग 6-4, 7-5 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. प्रद्युम्न ताताचर याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या नीव गोजियाचा 7-5, 1-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला. काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या आर्यन किर्तनेने आरव मुळ्येचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित वरद उंद्रेने आदित्य अरुणचे आव्हान 6-2, 6-1 असे संपुष्टात आणले.

मुलींच्या गटात स्वानिका रॉय, काव्या देशमुख, वरा ईश्वर, वैष्णवी नागोजी, प्रार्थना खेडकर, आयुश्री तरंगे, श्रावी देवरे, आरोही देशमुख यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:
वरद उंद्रे(महा)(1)वि.वि.आदित्य अरुण(महा)6-2, 6-1;
जय गायकवाड(महा)(5)वि.वि.मोहम्मद तल्हा(महा)6-1, 6-2;
पावक हरीणकुमार वि.वि. स्मित उंद्रे(महा)(3)6-0, 6-4;
सनत कडले(महा)वि.वि.अर्णव भाटिया(महा)(7) 6-4, 7-5;
प्रद्युम्न ताताचर(महा)वि.वि.नीव गोजिया(महा) 7-5, 1-6, 6-2;
आरव ईश्वर(महा)(4)पुढे चाल वि.आरुष पोतदार(महा)
आर्यन किर्तने(महा)वि.वि.आरव मुळ्ये(महा)6-1, 6-2;
शौनक सुवर्णा(महा)(2)वि.वि.वेदांत झोपे(महा)6-2, 6-0;

मुली:
स्वानिका रॉय(महा)(1)वि.वि.विवा तलरेजा(महा) 6-0, 6-0;
काव्या देशमुख(महा)(६)वि.वि.अयाती तुडयेकर(महा)6-2, 6-2;
वरा ईश्वर(महा)(3)वि.वि.रित्सा कोंडकर(महा)6-4, 6-2;
वैष्णवी नागोजी(महा)(8)वि.वि.श्रेया होनकन(महा)6-3, 6-4;
प्रार्थना खेडकर(महा)वि.वि.आस्था कुमार(महा)6-2, 6-3;
आयुश्री तरंगे(महा)वि.वि.आर्शी शेट्टी(महा)7-5, 6-0;
श्रावी देवरे(महा)(7)वि.वि.काव्या पांडे(महा)7-5, 6-0;
आरोही देशमुख(महा)(2)वि.वि.जान्हवी चौगुले 6-4, 6-2