September 23, 2025

पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कूल ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेत 160 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 6 ऑक्टोबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कूल ब्रॉन्झ सिरिज 2023   स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 7 व 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण 160 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा महाराष्ट्र पोलीस टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी रेशम रणदिवे यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक उमेश दळवी यांनी सांगितले.