September 23, 2025

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक

मुंबई, दि. ९/१०/२०२३: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४५/००० अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी ४५ / ८०० खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक १०.१०.२०२३ रोजी करण्यात येणार आहे. या लांबीत पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२.०० ते दुपारी २.०० या वेळेत पुर्णत: बंद राहणार आहे. सदर काम पुर्ण झाल्यावर दुपारी २.०० वाजता पुणेकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.