September 25, 2025

एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत श्रेया पठारे, रिशीता पाटील, काव्या देशमुख, अनुष्का जोगळेकर, प्रार्थना खेडकर, श्रेया होनकन यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे, 20 फेब्रुवारी 2024: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रेया पठारे, रिशीता पाटील, काव्या देशमुख, प्रार्थना खेडकर, श्रेया होनकन, शर्मिष्ठा कोद्रे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना(एमटी),परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित श्रेया पठारेने आपल्या लौकिकला साजेशी खेळी करत काव्या पांडेचा 6-2, 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित काव्या देशमुखने वैष्णवी नागोजीचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. चौथ्या मानांकित रिशीता पाटील हिने सान्वी राजूचे आव्हान 6-1, 6-2 असे मोडीत काढले. बिगरमानांकीत प्रार्थना खेडकरने पाचव्या मानांकित वीणा शिवरामनचा 6-3, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. आठव्या मानांकित श्रेया होनकनने ओवी मारणेचा 6-0, 6-1 असा सहज पराभव केला. शर्मिष्ठा कोद्रेने सृष्टी मिरगेचा 7-5, 6-1 असा तर, दुसऱ्या मानांकित अद्विता गुप्ताने अन्वी चव्हाणला 6-1, 6-0 असे पराभूत केले. अनुष्का जोगळेकर हीने सान्वी रॉयचे आव्हान 4-6, 7-5, 6-2 असे संपुष्टात आणले.

मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित आराध्या म्हसदेने प्रद्युम्न ताताचरचा 6-3, 6-1 असा पराभव करून विजयी मालिका कायम राखली. चौथ्या मानांकित कबीर जेटलीने सिद्धांत गणेशचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. संघर्षपूर्ण