पुणे, 25 फेब्रुवारी, 2024: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, केपीआयटी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत साईनाथ शिंदे याने केलेल्या उपयुक्त 46 धावांच्या जोरावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने मर्स्क संघाचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मर्स्क संघाने 20षटकात 9बाद 121धावा केल्या. यात दिनेश वाडकर 24, आदित्य साळुंखे 22, अनिल घाडगे नाबाद 13 यांनी धावा केल्या. टीसीएसकडून मिन्हाज अली(2-15), पूरब गजिनकर(2-12) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे आव्हान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने 15.5 षटकात 5बाद 125धावा करून पूर्ण केले. यात साईनाथ शिंदेने 37 चेंडूत 8चौकारासह 46 धावा, पंकज जिंटा नाबाद 25धावा, शुभम कबाडी 19, विक्रांत बांगर 13 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या सामन्यात दिपक जैन(3-33) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर .इन्फोसिस संघाने ॲमडॉक्स संघाचा 5 गडी राखून पराभव करत तीन विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य लढतीत शुभम झापडेकर(82धावा)याने केलेल्ये उत्कृष्ठ फलंदाजीच्या जोरावर केपीआयटी संघाने एफआयएस ग्लोबल संघावर 27 धावांनी विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
मर्स्क: 20षटकात 9बाद 121धावा(दिनेश वाडकर 24(22,3×4), आदित्य साळुंखे 22(23,4×4), अनिल घाडगे नाबाद 13, मिन्हाज अली 2-15, पूरब गजिनकर 2-12)पराभुत वि.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: 15.5 षटकात 5बाद 125धावा(साईनाथ शिंदे 46(37,8×4), पंकज जिंटा नाबाद 25(23,2×4), शुभम कबाडी 19, विक्रांत बांगर 13, प्रियांक चौहान 2-21, दिनेश वाडकर 1-16);सामनावीर- साईनाथ शिंदे; टीसीएस संघ 5 गडी राखून विजयी;
ॲमडॉक्स: 18.5 षटकात सर्वबाद 104धावा(विजय कुमार लोखंडे 46(44,8×4), पार्थ व्यास 13, संदीप संघाय 3-23, दिपक जैन 3-33, हर्षद तिडके 2-15) पराभुत वि.इन्फोसिस: 17.2षटकात 5बाद107धावा(हर्षद तिडके 31(39,1×4,2×6), राय तरुणकुमार 24, पिराजी रुपनूर नाबाद 17, संदीप संघाय 12, अनिकेत खंडागळे 1-9);सामनावीर- दिपक जैन; इन्फोसिस संघ 5 गडी राखून विजयी;
केपीआयटी: 20षटकात 7बाद 192धावा(शुभम झापडेकर 82(57,9×4,2×6), अलोक नागराज 34(35,5×4), मंगेश पाटील 10, सोमेश मर्दाने 10, निखिल भुजबळ 3-27)वि.वि.एफआयएस ग्लोबल: 20 षटकात 5 बाद 165धावा(मृदुल म्हात्रे 41(44,6×4), त्रिदीप महतो नाबाद 29, गीत देसाई 19, प्रशांत पोळ 17, निखिल भुजबळ 18, पार्थ गायकवाड 1-13, मयुरेश लिखीते 1-26); सामनावीर – शुभम झापडेकर; केपीआयटी संघ 27 धावांनी विजयी;
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय