July 27, 2024

एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत श्रेया पठारे, आराध्य म्हसदे यांना दुहेरी मुकुट

पुणे, 23 फेब्रुवारी 2024: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रेया पठारे हिने, तर मुलांच्या गटात आराध्य म्हसदे यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना(एमटी),परिहार चौक, औध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित श्रेया पठारेने चौथ्या मानांकित रिशीता पाटीलचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत अंतिम लढतीत श्रेया पठारेने रिशिता पाटीलच्या साथीत सारा फेंगसे व प्रार्थना खेडकर यांचा 6-1, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. श्रेया ही एसएस अजमेरा हायस्कुलमध्ये आठवी इयतेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित आराध्या म्हसदेने शार्दुल खवलेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीत आराध्य म्हसदे व दक्ष पाटील यांनी शार्दुल खवले व वरद पोळ या अव्वल मानांकित जोडीचा 6-3, 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी उमेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारुती राऊत, स्पर्धा निरीक्षक प्रणव वाघमारे, सरदार सिंग ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: मुले:
आराध्या म्हसदे(1) वि.वि. शार्दुल खवले 6-3, 6-2

मुली: श्रेया पठारे(1)वि.वि.रिशीता पाटील(4) 6-1, 6-1;

दुहेरी गट: अंतिम फेरी:
रिशिता पाटील/श्रेया पठारे वि.वि. सारा फेंगसे/प्रार्थना खेडकर 6-1, 6-4;

मुले: आराध्य म्हसदे/दक्ष पाटील वि.वि. शार्दुल खवले/वरद पोळ(1)6-3, 6-3.