पुणे, दि. २५: जिल्ह्यातील ३४-पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली आहे.
निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून ज्योती नारायण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-३०५ असा आहे. श्री. ज्योती नारायण यांचा संपर्क क्रमांक ९८११७५५४३९ व ०२०-२९९९७४३१ असा असून त्यांचा ईमले आयडी policeobserver34pune@gmail.com असा आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी विवेक पाडवी यांचा संपर्क क्रमांक ९८२३६६००७४ असा आहे. श्री.ज्योती नारायण हे सकाळी १०:३० ते ११:३० या वेळेत भेटतील, असे पुणे लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
More Stories
मुंबईच्या दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत लोखंडी होर्डिंग कोसळले; जीवित हानी नाही
बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यावर कारवाई करू – बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या बैठकीत आयुक्त अमितेश कुमार यांचे आश्वासन
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १३ वाहनांचा जाहीर ई-लिलाव