पुणे, ९ नोव्हेंबर २०२४ः ‘‘दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईलवरुन आरोप केले जात आहेत. पण त्या फाईलवर अंतिम चौकशीची स्वाक्षरी ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे. फडणवीस यांनी विरोधात असताना अजित पवार यांच्यावर आरोप केले, मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनीच अजित पवार यांना घरी बोलावुन ती फाईल दाखविली. कायद्याने हा गुन्हा असून याप्रकरणी फडणवीसांविरुद्ध खटला भरला पाहीजे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहीरट यांच्या प्रचारादरम्यान सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील महाराष्ट्राच्या राजकारणातील गौप्यस्फोटांवर सुळे यांनी भाष्य केले. तपास संस्थांमुळे महिला, कुटुंबांवर अन्याय झाल्याचे सांगत सुळे म्हणाल्या, ‘‘अदृश्य शक्तींनी केवळ विरोधी पक्षातील पुरुषांनाच नव्हे, महिला, कुटुंबांनाही लक्ष्य केले. रजनी इंदुलकर, नीता पाटील व विजया पाटील या माझ्या बहिणींच्या घरी प्राप्तीकर विभागाचे पाच दिवस छापे पडत होते. सुनेत्रा पवार यांचेही नाव त्यात घेण्यात आले. आमच्या घरातील महिलांवर, मुलांवर हल्ले करण्यात आले. छगन भुजबळ, नवाज मलिक, संजय राऊत, अनिल देशमुख या सगळ्यांचे कुटुंब कशातुन गेले, हे मी स्वतः पाहीले आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अदृश्य शक्तींना याचे उत्तर द्यावे लागेल.’
सुप्रिया सुळे म्हणाल्या, फडणवीस यांच्याशी जाहीर चर्चा करण्यास तयार. सरकारी संस्थांचा वापर करून विरोधी पक्ष फोडणे, घर फोडणे हे पाप. संविधान हातात घेणे गुन्हा असेल, तर आम्ही तो गुन्हा करणार. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा पहिला आरोप फडणवीसांकडूनच

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर