पुणे, २३ नोव्हेंबर २०२४ : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का देत महायुती पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदार होती. येथे ४५ जागांवर महायुतीने मुसंडी मारली. विशेष म्हणजे भाजपला २८ जागा मिळाल्या आहेत. त्यावरून मोहोळ यांनी विरोधकांवर हल्ला चढविल आहे. .
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, राज्यात महायुतील बहुमत दिल्याबद्दल मतदारांचे आभार. विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला राज्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यात अभूतपूर्व यश मतदारांच्या साथीने मिळाले.
या विश्वासाबद्दल मतदारांचे मनापासून आभार. मतदारांचा हा कौल म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर जनतेने मतांद्वारे व्यक्त केलेला विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल आणि संवेदनशील नेतृत्वाचाही हा विजय आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या गडावर मतदारांनी महायुतीचा झेंडा रोवत जवळपास ५८ पैकी ४५ जागा दिल्या आहेत, हा आकडा आमचे आखलेले मिशन पूर्ण करणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल. पुणे शहरातील आठपैकी सात आणि जिल्ह्यातील तेरापैकी अकरा जागा महायुतीला देताना पुणेकरांनी महायुतीच्या विकासाच्या कामांवर मोहोर उमटवली आहे.
विरोधकांच्या फेक अजेंड्याला देवेंद्रजींनी दिलेले थेट उत्तर जनतेलाअधिक आश्वासक वाटल्याने मतांचे भरघोस दान महायुतीच्या पदरात मतदारांनी टाकले. मतांच्या लाचारीपोटी व्होट जिहादच्या विरोधकांच्या कारस्थानाला जनतेने धर्मयुद्धाव्दारे उत्तर देऊन एक इशाराच दिला आहे. महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन. असं त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर