पुणे, २३ ऑगस्ट २०२५ ः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, डिसेंट फाउंडेशन, पुणे, पंचायत समिती व आरोग्य विभाग, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील आशासेविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर १८ ऑगस्ट रोजी महालक्ष्मी लॉन्स, जुन्नर येथे पार पडले. शिबिरात ३६५ आशासेविकांची तपासणी करून विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या.
शिबिरातील महत्त्वाच्या तपासण्या:
ब्रेस्ट व सर्वाइकल कॅन्सर स्क्रीनिंग
कॅन्सरच्या विविध प्रकारांसाठी रक्त तपासण्या
नेत्र तपासणी, बीपी, शुगर, ईसीजी
अस्थिरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, दंत तपासणी
शिबिरासाठी विशेष डेंटल व्हॅन व कॅन्सर व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच, मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय योजनेसंबंधी सर्वसमावेशक माहिती देण्यात आली.
शिबिराचे समन्वयक जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे होते. त्यांनी उपस्थितांना आरोग्य विभागातील विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाला डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई, आरोग्य समन्वयक डॉ. दयानंद गायकवाड, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुलमेथे, कॅन्सर सर्जन डॉ. अमेय डोके, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, समाजसेवा अधीक्षक समर्थ सरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या संस्था:
डॉ. डी. वाय. पाटील डेंटल रुग्णालय
इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, वाघोली
डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद व वैद्यकीय महाविद्यालय
टीजीएच कॅन्सर हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे
श्री हॉस्पिटल, आळेफाटा
विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नारायणगाव
आळेफाटा हॉस्पिटल
या उपक्रमामुळे आशासेविकांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढून त्यांना विविध आजारांचे लवकर निदान आणि उपचाराची संधी मिळाली आहे.
More Stories
रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मौसम माने पाटील, पूर्वा मुंडळे, अगस्त्य तितार, निरंजन मंत्री यांची विजयी आगेकूच कायम
गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे -पोलीस आयुक्त अमितेश कुमार
‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून दीड कोटीहून अधिक रुपयांची तडजोड-सोनल पाटील