April 29, 2024

कुंटे चेस अकादमी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत एकुण 160खेळाडू सहभागी

पुणे, 13 एप्रिल, 2024: कुंटे चेस अकादमी यांच्या वतीने व तलेरा गार्डन यांच्या सहकार्याने आयोजित कुंटे चेस अकादमी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून एकुण 160 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा तलेरा गार्डन, मार्केट यार्ड समोर, महर्षीनगर येथे रविवार, 14 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.

कुंटे चेस अकादमीच्या संचालिका मृणालिनी कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. पुण्यात बुद्धिबळ खेळाचा प्रसार व्हावा याहेतूने तलेरा गार्डनचे सुभाष तलेरा यांनी या स्पर्धेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

स्पर्धेत 160 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा तीन गटात होणार असून यामध्ये अ गटात गौरव बाकलीवाल(2106), अंजनेया पाठक(1953), प्रथमेश शेरला(1932) यांचा तर, ब गटात श्रावणी उंडाळे(1599), चिराग खत्री(1598), शुभम राहिंज(1592), अलौकिक सिन्हा(1588) यांचा समावेश आहे. हि स्पर्धा अ गटात ( 1600 वरील रेटेड खेळाडू), ब गटात ( 1400 ते 1600 रेटेड खेळाडू), क गटात(अनरेटेड खेळाडू)अशा गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 40000/-रुपयांची पारितोषिके प्रदान  करण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी आयए नितीन शेणवी हे चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत.