पुणे, १५ एप्रिल २०२५ः एकाद्या चित्रपटाप्रमाणे पुण्यात एक अनोखी चोरीची घटना घडल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. धायरी येथील एका सोन्याच्या दुकानात चक्क नकली पिस्तुलाची भिती दाखवत चोरट्यांनी सुमारे ३० तोळे इतक्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. तसेच दुकानाच्या मालकाला मारहान करत चोरांनी दुचाकीवरून पळ काढला.
ही घटना श्री ज्वेलर्स शॉप काळुबाई चौक , रायकर मळा, धायरी येथे मंगळवारी (ता. १५) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. याबाबत दुकानाचे मालक विष्णू सखाराम दहिवाल यांनी फिरयाद दिली आहे.
याबाबत झोन तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी साधारण ३ वाजता एक व्यक्ती या सोन्याच्या दुकानात आला तसेच त्याने सोन्याची चेन दाखविण्यास सांगितले. यावेळी दुकनाचे मालक दहिवाल व एक कामगार दुकानात होते. दरम्यान या व्यक्तीला चेन दाखवत असताना एकापाठोपाठ आणखी दोन जण दुकानात आले. त्यानंतर या तिघांनी मिळून ज्वेलर्स दुकानाच्या माकाला पिस्तूल दाखवली व धमकी देत शिवीगाळ करत दागिने चोरी करू लागले. त्यावेळी मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना हाताने व पिस्टलच्या बटने मारहाण करून जवळपास २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने चोरी करून, हे तिघेही दुचाकीवरून पळून गेले. मात्र त्यांनी दाखवलेली पिस्तूल नकली असल्याचे आढळून येत आहे.”
दरम्यान पळून गेलेल्या चोरांचे वर्णन पुढील प्रमाणे –
चोरी करणाऱ्यांपैकी पहिल्या इसमाचे वय अंदाजे ३५ वर्षे, लाल रंगाचे हाफ टी शर्ट व निळी जीन्स पॅन्ट घातली होती. दुसऱ्याचे वय अंदाजे २५ वर्षे असून त्याने गोल गळ्याचा फुल काळा टी-शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. तसेच त्याने काळया रंगाची टोपी व तोंडावर मास्क लावलेला होता. दरम्यान तिसऱ्याचे वय देखील जवपाळ २५ वर्षे असेल. त्याने क्रीम रंगाचा गोल गळ्याचा व फुल बाह्यांचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली होती. त्याबरोबर पांढरे बूट, डोक्यामध्ये खाते रंगाची कॅप, पाठीवरती काळया रंगाची बॅग होती.
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार