पुणे, 23/04/2025: वडगावशेरी मतदारसंघातील पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा तसेच इतर वाहतूक संदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पर्यायी रस्त्यांची पाहणी केली. यात प्रामुख्याने, नदीपात्रालगतचा खराडी-शिवणे रस्ता, ५०९ चौक ते धानोरी जुना जकात नाका तसेच विमानतळ ते रामवाडी यांचा समावेश होता.
लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना सहन करावा लागणारा वाहतुकीचा गंभीर प्रश्न सोडवण्याकरिता सातत्याने विविध मध्यमातून व विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पर्यायी मार्ग सुरू झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिक बांधव यातून सुटकेचा नि:श्वास घेतील, ही खात्री आहे. – बापूसाहेब पठारे (आमदार, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ)
सद्यस्थितीनुसार वाहतूकीचे प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी वाहतूक मार्गाचा विचार करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. पुणे-नगर रस्त्याची वाहतूक कोंडी मार्गी लावण्यासाठी नदीपात्रालगतचा खराडी-शिवणे रस्ता महत्त्वाचा मानला लागतो. जो की भूसंपादनामुळे रखडला आहे. तसेच, पुणे विमानतळाचा रन-वे वाढवल्यामुळे ५०९ चौक ते लोहगाव हा एअर फोर्स हद्दीतील रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. पर्यायी मार्ग म्हणून ५०९ चौक ते धानोरी जुना जकात नाका तसेच विमानतळ ते रामवाडी हे रस्ते होणे क्रमप्राप्त आहे.
पाहणीदरम्यान, सदर रस्ते येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन अधिकारी वर्गाने दिले आहे. पठारे यांनी अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खराडी-शिवणे रस्त्याच्या भूसंपादनाबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यावर प्रशासकीय मार्गाने तोडगा काढण्याबाबत सूचना केल्या.
महानगरपालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता संजय धारव, राजेश भुतकर, अजित सुर्वे, मकरंद वाडेकर आदि अधिकारी यावेळी उपस्थित होते.
More Stories
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान