पुणे, दि. 7/07/2025: वाहनधारकांनी वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविताना http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे अत्यावश्यक आहे. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांनी वाहनांवर एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहनही श्री. भोसले यांनी केले आहे.

More Stories
दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त