October 27, 2025

पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

पुणे, 24 ऑक्टोबर 2024: २०२-पुरंदर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांनी दिली आहे.

श्री.सुमित कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०२ असा असून संपर्क क्रमांक ९९६९२९८४१५ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी गणेश लालासो सस्ते हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८९०९४९५८७ असा आहे.

श्री. सुमित कुमार सकाळी १० ते १२ या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे या ठिकाणी भेटतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती लांडगे यांनी दिली आहे.
दरम्यान, श्री सुमित कुमार यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघ कार्यालयास भेट दिली. तसेच प्रत्येक कक्षाची माहिती घेऊन त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनादेखील दिल्या. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, निवडणूक खर्च कक्ष समन्वयक अधिकारी सुनिल परदेशी, आचार संहिता कक्ष समन्वयक डॉ.अमिता पवार, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी निरीक्षक संभाजी बर्गे तसेच इतर निवडणूक विषयक विविध कक्षांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.