November 7, 2024

पर्वती विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

पुणे, 24 ऑक्टोबर 2024:पर्वती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मनोज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली.

श्री. उमेश कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०५ असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ७७६८०३६२३० असा आहे. त्यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ दुपारी ३.३० वाजेपासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सुहास विसपुते हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९०११०२७१८७ असा आहे. मतदारसंघातील काही तक्रारी असल्यास निवारणाकरिता सी – व्हिजिल अॅप, तसेच ०२० – २९९५२१३४ या हेल्पडेस्कवर नोंदविण्याचे आवाहन पर्वती विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.