पुणे, १८ ऑगस्ट २०२४ ः बाणेर टेकडीवर सकाळी चालण्यासाठी गेलेल्या नॅगलॅंड येथील दोन महिलांना लोखंडी रॉडने मारहाण करून लुटमार करण्याचा घटना रविवारी (दि. १३) रोजी घडली होती. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
द्रापेत ऊर्फ विशाल प्रभाकर समुखराव (वय-१९ वर्ष, रा-कुंभार यांची चाळ, बोराडेवाडी, गोल्ड जिम समोर, वाघेश्वर कॉलनी, जाधवाडी चिखली पुणे. मुळपत्ता-मु.पो. म्हाळुंगी, ता. चाकुर, जि. लातुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अबिनीयु खांन्गबुबो चवांग (वय-३६ वर्ष, धंदा-नोकरी, रा-रोहन निल अपार्टमेंन्ट, जी/ब्लॉक, फलॅट नं.१०१, औंध पुणे. मुळपत्ता-समजीरम गाव, जल्युकेई जि. पेरेन, राज्य-नागालँन्ड) या महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
अबिनीयु चवांग या आणि त्यांची मैत्रिण चिंगमलिऊ पोमेई अपर पोमेई तिघी बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाणेर टेकडीवर रविवारी सकाळी फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ करुन त्यांना लोखंडी हत्याराने मारहाण करुन त्यांचेकडील अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, बर्डस, सॅक असा एकुण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याप्रकरणी अबिनीयु चवांग यांनी फिर्याद दिली होती.
या घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपास पथक नेमले. या पथकाला द्रापेत ऊर्फ विशाल प्रभाकर समुखराव आणि दोन अल्पवयीन मुलांची माहिती मिळाली. त्यांना पकडण्यासाठी गेले असताना हे तिघे पळून जाऊ लागले. तेव्हा त्यांना मोटार सायकलवर पाठलाग करुन ताब्यात घेवुन अटक केली. त्यांच्याकडून चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा एकुण- १ लाख १० हजारचा ऐवज जप्त केला.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, परिमंडळ चारचे उपायुक्त हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, विजयानंद पाटील, तपास पथकाचे अधिकारी, उपनिरीक्षक प्रणिल चौगले, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, सुधाकर माने, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के यांन ही कारवाई केली.
More Stories
पुणे महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे वर्चस्व
मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार