पुणे, 5 ऑक्टोबर 2023: संदीप किर्तने टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित भारती विद्यापीठ एमएसएलटीए डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात वरद उंद्रे याने, तर मुलींच्या गटात स्वानिका रॉय यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत एकेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित वरद उंद्रेने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सनत कडलेचा 6-1, 6-3 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या मानांकित शौनक सुवर्णा याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या प्रद्युम्न ताताचरचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत उपांत्य फेरीत रद उंद्रे व स्मित उंद्रे या अव्वल मानांकित जोडीने चौथ्या मानांकित सिध्दांत गणेश व सनत कडले यांचा 6-1, 6-4 असा पराभव तर, नमिश हुड व आर्यन किर्तने यांनी रोहन बजाज व आदित्य अरुण यांचा 6-1, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित स्वानिका रॉय हिने तिसऱ्या मानांकित वरा ईश्वरचा 6-2, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या मानांकित आरोही देशमुखने प्रार्थना खेडकरचा 6-1, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अव्वल मानांकित स्वानिका रॉय व श्रावी देवरे यांनी रित्सा कोंडकर व काव्या पांडे यांचा 6-2, 6-0 असा तर, दुसऱ्या सामन्यात स्वरा जावळे व काव्या देशमुख या जोडीने श्रेया होनकन व मायरा टोपनो यांचा 6-2, 6-2 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी): मुले:
वरद उंद्रे(महा)(1)वि.वि.सनत कडले(महा)6-1, 6-3;
शौनक सुवर्णा(महा)(2)वि.वि.प्रद्युम्न ताताचर(महा) 6-4, 6-2;
मुली:
स्वानिका रॉय(महा)(1)वि.वि.वरा ईश्वर(महा)(3)6-2, 6-1;
आरोही देशमुख(महा)(2)वि.वि.प्रार्थना खेडकर(महा) 6-1, 6-3;
दुहेरी: मुले:
वरद उंद्रे/स्मित उंद्रे(1)वि.वि.सिध्दांत गणेश/सनत कडले(4) 6-1, 6-4;
नमिश हुड/आर्यन किर्तने वि.वि.रोहन बजाज/आदित्य अरुण(3)6-1, 6-2;
मुली:
स्वानिका रॉय/श्रावी देवरे (1) वि.वि.रित्सा कोंडकर/काव्या पांडे(4) 6-2, 6-0;
स्वरा जावळे/काव्या देशमुख(2)वि.वि.श्रेया होनकन/मायरा टोपनो(3)6-2, 6-2.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय