पुणे, २०/१२/२०२३: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी १०.७५० (अमेटी युनिर्व्हसिटी) व कि.मी २९.२०० (मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.
या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (कार) शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून एन.एच.४ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

More Stories
बनावट वेबसाइट्स,अॅप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन
पुणे विमानतळातील बिबट्या यशस्वीपणे बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या पकडला
शिवसेनेची १६५ जागा लढविण्याची तयारी – महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर