सोलापूर, 6 जुलै 2024 – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेने (एस.डी.एल.टी.ए) यांच्या वतीने इलिझियम क्लब पुरस्कृत आणि अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य आयटीएफ एस400 लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली वरिष्ठांच्या तिसऱ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत 45 वर्षांवरील पुरूष गटात बोसेकिरण नल्लामोथूने मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
एम.एस.एल.टी.ए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल व इलिझियम क्लबच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 45 वर्षांवरील पुरूष गटात पहिल्या फेरीत भारताच्या बिगरमानांकित बोसेकिरण नल्लामोथूने अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग दोडीचा 0-6, 7-5, 10-7 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करत सनसनाटी निकाल नोंदवला. सदासिवम एस याने पंकज कुलकर्णीचा 6-0, 6-1 असा सहज पराभव केला.
55 वर्षांवरील पुरूष उपांत्यपूर्व फेरीत तिकम सिंग पन्वर याने जितेंद्र जोशीचा 6-3, 6-1 असा तर, परमदिप सिंग बाजवाने सुभाष पटेलला 7-5, 6-4 असे नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचे उदघाटन एम राज कुमार , पोलीस आयुक्त , सोलापूर व इलिझियम क्लबचे व्यवस्थापकीय संचालक मोहित सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर, स्पर्धा संचालक डोसा रामाराव, एमएसएलटीएचे सहमानद सचिव राजीव देसाई, संध्यारानी बंडगर, नरेंद्र पवार, राजकुमार डीडे, सत्येन जाधव, डॉ भालचंद्र किनिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: 45 वर्षांवरील पुरूष: पहिली फेरी:
बोसेकिरण नल्लामोथू(भारत) वि.वि.स्वरणदीप सिंग दोडी (भारत)(1) 0-6, 7-5, 10-7;
सदासिवम एस(भारत)वि.वि.पंकज कुलकर्णी(भारत) 6-0, 6-1;
50 वर्षांवरील पुरूष: पहिली फेरी:
दिपक बागोरा (भारत) वि.वि.हतींदर पन्वर (भारत)6-0, 6-1;
35 वर्षांवरील पुरूष: पहिली फेरी:
आरूष शहा(भारत)वि.वि.गौरव पटेल(भारत)6-0, 6-2;
55 वर्षांवरील पुरूष: उपांत्यपूर्व फेरी:
तिकम सिंग पन्वर(भारत) वि.वि.जितेंद्र जोशी(भारत) 6-3, 6-1;
परमदिप सिंग बाजवा (भारत)वि.वि.सुभाष पटेल(भारत)7-5, 6-4;
More Stories
डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत इम्पेरियल स्वान्स, साइनुमेरो जालन गोशॉक, ऑप्टिमा फाल्कन्स संघांची विजयी सुरुवात
चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून