September 12, 2025

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहातील रिक्त पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, १० जून २०२५ : सैनिकी मुलांचे वसतिगृह पर्वती आणि मुलींचे वसतिगृह नवी पेठ येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने विविध पदे भरण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिक तसेच नागरिकांना 20 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहात अतिरिक्त सहायक वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका पदाच्या अनुक्रमे पुरुषांसाठी 4 व महिलांसाठी 2 जागा रिक्त असून या पदाकरीता 24 हजार 875 रुपये, चौकीदार पदाच्या पुरुषांसाठी प्रत्येकी 1 जागा रिक्त असून यापदाकरीता 20 हजार 886 रुपये, सफाई कामगार पदाच्या अनुक्रमे पुरुष किंवा महिला 4 आणि महिलांसाठी 2 जागा रिक्त असून या पदाकरीता 13 हजार 89 रुपये, स्वयंपाकी पदाच्या महिलांसाठी अनुक्रमे 10 व 7 जागा रिक्त असून या करिता 13 हजार 924 रुपये आणि माळी पदाच्या अनुक्रमे पुरूषांसाठी 1 व महिलांसाठी 1 जागा रिक्त असून 13 हजार 89 रुपये इतके दरमहा मानधन अदा करण्यात येणार आहे.

अर्ज संबंधित वसतिगृहात सादर करावयाचे असून अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल (भ्र. ध्व. क्र. 7020410954) तसेच वसतिगृह अधीक्षिका कांचन नवगिरे (भ्र. ध्व. क्र. 7776805824) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल हंगे स.दै. (नि) यांनी केले आहे.