पुणे, 12 ऑगस्ट 2024: पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहाकरिता सहायक वसतिगृह अधीक्षकाची पुरुषांसाठीची दोन पदे अशासकीय कर्मचारी म्हणून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून त्यासाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही पदे २४ हजार ४७७ रूपये मानधनावर भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२२८७ वर संपर्क साधावा, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस.डी. हंगे (नि.) यांनी कळविले आहे.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान