पुणे, 06 ऑक्टोबर 2023 : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे-अहमदनगर रोडवरून शास्त्रीनगर व रामवाडी चौक येथून आगाखान पुल मार्गे कोरेगाव पार्क व मुंढवाकडे येणारी व जाणारी जड वाहने, कोरेगाव पार्क परिसरातून साऊथ व नॉर्थ मेन रोड व बर्निंग घाटरोड वरून एबीसी फार्महाऊस चौकमार्गे कल्याणीनगर व मुंढवाकडे येणारी व जाणारी जड वाहने तसेच ताडीगुत्ता चौकातून नॉर्थ मेन रोड कोरेगाव पार्ककडे येणाऱ्या व जाणाऱ्या जड वाहनांना सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत व सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात २० ऑक्टोबर पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उप आयुक्त वाहतूक, पुणे शहर विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन