पुणे, दि.१९ : कोंढवा वाहतूक विभागाच्या हद्दीत पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु असल्यामुळे शितल पेट्रोल पंप चौकाकडून ज्योती हॉटेल चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक १० जूनपर्यंत बंद करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पर्यायी मार्ग म्हणून वेलकम हॉल जंक्शन, मेफेअर सोसायटी जंक्शनमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप अशी एकेरी वाहतूक सुरु राहणार आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

More Stories
श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी
लोणावळा हत्याकांड: मालमत्तेच्या वादातून आजोबांनी नातवाची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप; पुरावे लपवल्याप्रकरणी पाच जणांना अटक
नदीकाठी जाण्यासाठी १७ कोटी मोजावे लागणार