पुणे, २१/०१/२०२५: अलिकडच्या काळात वाचनापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक आणि वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी डेक्कन कॉलेजतर्फे ३० डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यापीठाच्या ग्रंथालयाने वाचन (कला, कौशल्य, अध्यापन, शिक्षण, आव्हाने) या विषयावरील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते जे 30 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान अभ्यागतांसाठी खुले ठेवण्यात आले होते. विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत स्थापन केलेल्या डेक्कनाइट बुकीज रीडिंग क्लबतर्फे संयुक्तपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जसे कि विद्यापीठात 1 जानेवारी 2025 रोजी वाचन कौशल्यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
विशेषज्ञ प्रा. के. पद्दय्या आणि श्री. गोपाळ जोगे, यांनी या कार्यशाळेतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्य इमारतीच्या प्रांगणात लॉनवर सामूहिक वाचन उपक्रमही यशस्वीरित्या पार पडला. 7 जानेवारी 2025 रोजी लेखक आणि वाचक यांच्यातील संवाद सत्राचे आयोजन केले होते. या मध्ये डॉ. उदय कुलकर्णी आणि डॉ. केदार फाळके या ऐतिहासिक ग्रंथ लेखकांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. शंतनू वैद्य यांनी कार्यक्रम नियंत्रक म्हणून भूमिका पार पडली. तसेच विद्यापीठात पुस्तक समीक्षा आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 16 जानेवारी 2025 रोजी स्पर्धेतील सहभागींनी सादर केलेल्या पुस्तक परीक्षणांचे तोंडी कथन केले होते. श्री. गोपाळ जोगे आणि डॉ. संभाजी जाधव यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पहिले. या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट तीन विजेत्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांना 26 जानेवारी 2025 रोजी पारितोषिक दिले जाईल. प्रभारी कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी आणि शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. सोनल कुलकर्णी-जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल डॉ. तृप्ती मोरे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. निलेश जाधव यांनी हा उपक्रम विद्यापीठात यशस्वीरित्या राबविला. या उपक्रमासाठी कुलसचिव श्रीमती अनिता सोनवणे यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभले. या सर्व कार्यक्रमांस विद्यार्थ्यांचा आणि कर्मचार्यांचा सहभाग व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवश्री बॅनर्जी या विद्यार्थिनीने सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.
More Stories
पुणे: आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात…विद्यार्थ्यांचे औक्षण करून,साखर वाटून स्वागत
पुणे: राज्याचे माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण
अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….