पुणे, दि. 20 सप्टेंबर 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वात जुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्या डावात अजय बोरूडे(4-13), आशय पालकर(3-46) यांनी केलेल्या गोलंदाजीसह अथर्व वणवे(78धावा), सूरज शिंदे(नाबाद 54धावा) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पूना क्लब संघाविरुद्ध आघाडी घेत वर्चस्व गाजवले.
पीवायसी हिंदू जिमखाना, डिझायर स्पोर्टस क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन दिवसीय अंतिम फेरीच्या लढतीत पूना क्लब संघाने 27 षटकात सर्वबाद 162 धावा केल्या. दहा गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 112धावा(वजा50धावा) झाली. यात अकीब शेख 38, अजिंक्य नाईक 23 धावा केल्या. डेक्कन जिमखानाकडून अजय बोरूडे(4-13), आशय पालकर(3-46) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाने आज दिवस अखेर 26षटकात 3बाद 214धावा केल्या. यात अथर्व वणवेने 65चेंडूत 6चौकार व 4 षटकारासह 78 धावा केल्या. त्याला, सूरज शिंदेने 70चेंडूत 4चौकार व 1षटकारासह नाबाद 54 धावांची खेळी करून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यांसाठी 110 चेंडूत 121धावांची भागीदारी करून साथ दिली. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे. डेक्कन जिमखाना संघाच्या पहिल्या डावातील अजून 14 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
पीवायसी मैदान: पहिला डाव : पूना क्लब: 27 षटकात सर्वबाद 112धावा(162-50धावा)(अकीब शेख 38(40,7×4), अजिंक्य नाईक 23(39,2×4), अजय बोरूडे 4-13, आशय पालकर 3-46) वि.डेक्कन जिमखाना: 26षटकात 3बाद 214धावा(अथर्व वणवे 78(65, 6×4,4×6), सूरज शिंदे नाबाद 54(70,4×4,1×6),अजय बोरूडे नाबाद 13, हर्षल मिश्रा 2-27, अखिलेश गवळी 1-44);

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश