May 4, 2024

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाला विजेतेपद

पुणे, दि. 21 सप्टेंबर 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वात जुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्या डावात अजय बोरूडे(4-13 व 3-25), आशय पालकर(3-46), पियूश साळवी (3-42)यांनी केलेल्या गोलंदाजीसह सूरज शिंदे(106धावा) याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पूना क्लब संघाचा एक डाव व 112 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत दोन दिवसीय अंतिम फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी डेक्कन जिमखाना संघाचा आज 26षटकात 3बाद 214धावापासून खेळ पुढे सूरू झाला. तत्पूर्वी काल डेक्कन जिमखानाच्या अजय बोरूडे(4-13), आशय पालकर(3-46) यांच्या भेदक गोलंदाजीपुढे पूना क्लब संघाचा डाव 27 षटकात सर्वबाद 162 धावावर संपुष्टात आला. दहा गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 112धावा(वजा50धावा) झाली. यात अकीब शेख 38, अजिंक्य नाईक 23 धावा केल्या.
याच्या उत्तरात  डेक्कन जिमखाना संघाने 40षटकात 7बाद 313धावा केल्या. 7 गडी बाद झाल्याने संघांची अंतिम धावसंख्या 278धावा(वजा 35 धावा) झाली.यात सूरज शिंदेने 114 चेंडूत 8चौकार व 2 षटकारासह 106 धावांची शतकी खेळी केली. त्यालाअथर्व वणवेने 65चेंडूत 6चौकार व 4 षटकारासह 78 धावा काढून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यांसाठी 110 चेंडूत 121धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सूरज शिंदे व अजय अजय बोरूडे(26धावा) यांनी 101चेंडूत 63 धावांची भागीदारी करून संघाला पहिल्या डावात 166 धावांची आघाडी मिळवून दिली. पूना क्लब कडून हर्षल मिश्रा(4-47), अखिलेश गवळी(1-45), शुभम कोठारी(1-51) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
दुसऱ्या डावात डेक्कन जिमखाना संघाच्या आशय पालकर 3-20, पियूश साळवी 3-42, अजय बोरूडे 3-25) यांच्या अचूक गोलंदाजीपुढे पूना क्लबचा डाव 10.7 षटकात सर्वबाद 104धावावर कोसळला. 10 गडी बाद झाल्याने पूना क्लबची धावसंख्या 54(वजा 50धावा) झाली. त्यामुळे डेक्कन जिमखाना संघाने एक डाव व 112 धावांनी विजय मिळवला. पूना क्लब कडून सागर बिरदवडेने सर्वाधिक 49 धावा केल्या.
स्पर्धेतील विजेत्या डेक्कन जिमखाना संघाला गोल्डफिल्ड मांडके शिल्ड प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव सारंग लागु, गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे संचालक अनिल छाजेड व रोहन छाजेड, एमसीए अपेक्स कमिटीचे सदस्य कमलेश पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव व एमसीए अपेक्स कमिटीचे सदस्य विनायक द्रविड, निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
पीवायसी मैदान: पहिला डाव : पूना क्लब: 27 षटकात सर्वबाद 112धावा(162-50धावा) वि.डेक्कन जिमखाना: 40षटकात 7बाद 278धावा(313-35 धावा)(अथर्व वणवे 78(65, 6×4,4×6), सूरज शिंदे 106(114,8×4,2×6),  अजय बोरूडे 26(41,3×4),  हर्षल मिश्रा 4-47, अखिलेश गवळी 1-45, शुभम कोठारी 1-51); डेक्कन जिमखाना संघाकडे पहिल्या डावात 166धावांची आघाडी;
दुसरा डाव: पूना क्लब: 10.7 षटकात सर्वबाद 54धावा (104-50धावा)(सागर बिरदवडे 49(35,6×4,2×6), धनराज परदेशी 20, आशय पालकर 3-20, पियूश साळवी 3-42, अजय बोरूडे 3-25) वि. डेक्कन जिमखाना: . डेक्कन जिमखाना संघ एक डाव व 112 धावांनी विजयी.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: यश नाहर;
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: अजय बोरूडे;
मालिकावीर: तुषार श्रीवास्तव.