पुणे, 28 जानेवारी, 2025 : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू हॉकी टूर्नामेंट सोसायटीच्या (जेएनएचटीएस) अध्यक्षपदी डॉ. (सौ.) वृषाली भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या एका विशेष बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
1964 मध्ये स्थापन झाल्यापासून भारतात हॉकीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत.
वैयक्तिक कारणास्तव पायउतार झालेले उद्योगपती यश भारवानी यांच्या पश्चात डॉ. भोसले अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. यापूर्वी, ए. के. सेन, वाय. बी. चव्हाण, शरद पवार आणि काही ऑलिम्पियन दिग्गजांनी हे अध्यक्षपद भूषवले आहे.
डॉ. भोसले म्हणाले, “नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू हॉकी सोसायटीची नवनिर्वाचित अध्यक्ष या नात्याने तुमच्यासमोर उभे राहणे हा माझा मोठा सन्मान समजते.
हा क्षण केवळ वैयक्तिक मैलाचा दगड नाही तर भारतीय क्रीडा प्रशासनातील समावेशकता आणि प्रतिनिधित्वासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे पद भूषवणारी पहिली महिला या नात्याने, मला या भूमिकेतील जबाबदारी आणि संधीची जाणीव आहे.
जवाहरलाल नेहरू हॉकी सोसायटीचा वारसा पुढे चालू ठेवत नाविन्य आणि सर्वसमावेशकता वाढवणे हे अध्यक्ष म्हणून माझे ध्येय आहे. हॉकी हा एक खेळ नसून ती एक एकत्रित शक्ती आहे. जिने आपल्या राष्ट्राला अभिमान आणि गौरव प्राप्त केला आहे. ”
जवाहरलाल नेहरू हॉकी सोसायटीला त्यांच्या पाच वार्षिक स्पर्धांद्वारे जागतिक दर्जाच्या प्रतिभेला जोपासण्याचा वारसा लाभला आहे. शेवटची स्पर्धा 6 ऑक्टोबर ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान झाली. या स्पर्धांनी आजवर अजितपाल सिंग, डॉ. दिलीप तिर्की, जफर इक्बाल आणि गगन अजित सिंग यांच्यासारखे हॉकी दिग्गज दिले आहेत.
डॉ. वृषाली भोसले या एक प्रख्यात वैद्यकीय प्रॅक्टिशनर आणि एसएनबीपी ग्रुप अंतर्गत एसई सोसायटीच्या अध्यक्षा आहेत. हॉकीची आवड आणि या खेळासाठीच्या योगदानामुळे त्यांनी इथवर मजल मारली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असलेले चिखली क्रीडा संकुल हे त्यांच्या तळागाळातील क्रीडा विकासासाठीच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
नवनिर्वाचित भोसले यांच्या अध्यक्षपदाखाली नेतृत्वाखाली हॉकी सोसायटीतर्फे मार्च 2025 मध्ये नेहरू महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. क्वालालंपूर येथील भारताच्या ऐतिहासिक 1975 विश्वचषक जेतेपदाच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त ही स्पर्धा होणार आहे.
टोकियो 2021 आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर डॉ. भोसले यांच्या नेतृत्वाखालील संस्थेचे, युवा प्रतिभांना चालना देण्याची आणि राष्ट्रीय खेळात देशाचा वारसा मजबूत करण्याची परंपरा सुरू ठेवण्याचे ध्येय आहे.
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार