May 5, 2024

पिण्याचे पाणी आता थेट दारात; शेवाळेवाडीतील स्त्रियांना महिला दिनी भाजपतर्फे अनोखी भेट

मांजरी, ८ फेब्रुवारी २०२४: दोन हांडे पाणी मिळवण्यासाठी होणारी पायपीट, पाणी आल्यानंतर टँकर ते घरापर्यंत आणण्यासाठी होणारा त्रास ,हे लक्षात घेऊन येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी स्वखर्चाने थेट दारापर्यंत पाण्याची लाईन टाकून महिलांना महिला दिनी अनोखी भेट दिली आहे.

शेवाळेवाडी गावातील काही भागांमध्ये गेली अनेक वर्षे पाणी पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. रस्ते अरुंद असल्याने पाण्याचे टँकरही या परिसरात जावू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना एक -दोन हांड्यासाठी गावभर पायपीट करावी लागत होती. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

ज्या भागात टँकर ही जावू शकत नाहीत. अशी दीडशे ते दोनशे घरे आहेत या भागाची पाहणी करून राहुल शेवाळे यांनी स्वखर्चाने पाण्याची लाईन टाकून पुणे महानगरपालिकेच्या टँकरद्वारे शेवटच्या टोकाला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे.महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे काम केले आहे. याचे समाधान वाटते आहे,अशी भावना शेवाळे यांनी व्यक्त केली.

यावेळी रामभाऊ शेवाळे, नामदेव गावडे, राजेंद्र घुले, सुरेश शेवाळे, दीपक ढोरे, अक्षय मेमाणे, बाळासाहेब भंडारी, तेजस कलाल, रामहरी वांकर, ज्ञानेश्वर कुंभार, शिवम गुप्ता, बाळासाहेब खवले वमहिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.