पुणे, दि. २२/१०/२०२४: आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (अ.जा.) मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.
या कक्षामार्फत निवडणूक प्रचारासंबंधी वाहन परवाने, प्रचार सभा, कोपरा सभा परवानगी, तात्पुरत्या पक्ष कार्यालयासाठीची परवानगी, रॅली, मिरवणूक, रोड- शो, पदयात्रा यासंबंधीच्या परवानग्या, स्टेज, बॅरीकेटस्, व्यासपीठासाठीच्या परवानग्या त्यासंबंधीत करावयाच्या अर्जांचे विहित नमुने व आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती उमेदवारांना पुरविण्यात येणार आहेत.
एक खिडकी कक्षातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय भारतरत्न सर विश्वेश्वरय्या हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र ५, ३ रा मजला, अर्सेनल प्लॉट, हॉटेल सागर प्लाझासमोर, कॅम्प, पुणे याठिकाणी संपर्क साधावा, असेही श्री. भंडारे यांनी कळविले आहे.
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा