September 20, 2025

नवले ब्रीजवर भीषण अपघात; ट्रकने ५ वाहनांना दिली धडक, एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे, ३ मे २०२५: पुण्यातील नवले ब्रीज परिसरात आज दुपारी एक भयंकर अपघात घडला. कात्रजकडून येणाऱ्या एका ट्रकने ब्रेक फेल झाल्याने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने जवळच्या नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून नवले ब्रीज येथे सातत्याने अपघातांचा सत्र सुरू असून अनेक अपघात झालेले आहेत. असे असताना हा अपघात दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रकच्या धडकेत दुचाकी व रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. यात एकाचा मृत्यू आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आरोपी चालक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनीही घटनेची पुष्टी केली असून याबाबत त्यांनी सांगितले की, या अपघातात ट्रॅकने दोन दुचाकी, दोन रिक्षा आणि एका चारचाकी वाहनांना उडवले आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात दुचाकी आणि रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.