September 24, 2025

18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत एफआयएस ग्लोबल संघाची एसएस अँड सी अॅडव्हेंट संघावर मात

पुणे, 05 जानेवारी, 2024: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद  स्पर्धेत साखळी फेरीत प्रशांत पोळच्या उपयुक्त 46 धावांच्या खेळीच्या जोरावर एफआयएस ग्लोबल पुणे संघाने एसएस अँड सी अॅडव्हेंट संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
 
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना एसएस अँड सी अॅडव्हेंट संघाने 20 षटकात 4बाद 149धावा केल्या. यात हरीश केआर 34, अकबरअली खान नाबाद 49, मनीष सुपल नाबाद 20, राहुल कृष्णन 13, राजीव सिंग 13, अक्षय झारेकर 13 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. एफआयएस ग्लोबल संघाकडून सिद्धार्थ राणे(2-17), ऋत्विक महाजन (1-36) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
याच्या उत्तरात एफआयएस ग्लोबल पुणे संघाने हे आव्हान 19 षटकात 4बाद 152धावा करून पूर्ण केले. यात प्रशांत पोळने 32चेंडूत 6चौकार व 1 षटकारासह 46धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला मृदुल म्हात्रेने 30धावा, निशिथ गुप्तेने 16धावा, गीत देसाईने नाबाद 15 धावा काढून साथ दिली. सामन्याचा मानकरी प्रशांत पोळ ठरला.
 
संक्षिप्त धावफलक: साखळी फेरी:
एसएस अँड सी अॅडव्हेंट: 20 षटकात 4बाद 149धावा(हरीश केआर 34(27,1X4,3X6), अकबरअली खान नाबाद 49(33,5×4,2×6), मनीष सुपल नाबाद 20, राहुल कृष्णन 13, राजीव सिंग 13, अक्षय झारेकर 13 , सिद्धार्थ राणे 2-17, ऋत्विक महाजन 1-36) पराभुत वि.एफआयएस ग्लोबल पुणे: 19 षटकात 4बाद 152धावा(प्रशांत पोळ 46(32,6×4,1×6), मृदुल म्हात्रे 30(33,3×4,1×6), निशिथ गुप्ते 16 , गीत देसाई नाबाद 15, जुबेल 2-31, राजीव चेंपथ 1-23);सामनावीर-प्रशांत पोळ; एफआयएस ग्लोबल 6 गडी राखून विजयी.