पुणे, २५ जुलै २०२४ : जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेतील असमन्वयामुळेच पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केला. शहरातील पूरस्थितीचा पाहणी करण्यासाठी मोहोळ हे रात्री दिल्लीतून पुण्यात दाखल झाले त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला.
मोहोळ म्हणाले, ‘जलसंपदा विभागाने आधी ३५ हजार नंतर चाळीस हजार आणि पहाटे ५५ हजार क्युसेस पाणी धरणातून सोडले. पण याची माहिती महापालिकेला दिली नाही या सर्व प्रकाराची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल.
अनेक वर्षानंतर असा मोठा पाऊस झाला आहे. असा मोठा पाऊस झाला तरच धरणातून विसर्ग केल्यानंतर पुणे शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होत होती
४० हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग केल्यानंतर अशी पूरस्थिती निर्माण होत नव्हती. पण आज पहाटे अगदी ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने पुण्यात हाहाकार झाला. त्यामुळं मी अधिवेशन सोडून आलो. ही माझी जबाबदारी आहे. सकाळ पासून मी आढावा घेतलाय, उद्या परत मी जिल्हाधिकारी आणि पालिलेकडून पुन्हा माहिती घेतली जाईल.

More Stories
मुळशी पॅटर्न-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; युवा उद्योजक पुनीत बालन आणि अभिजीत भोसले यांची घोषणा
सारसबाग बंद ठेवण्यावरून पुन्हा वाद; गेल्या वर्षी धार्मिक कारण, यंदा सुरक्षेचा मुद्दा
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा