पुणे, २९ एप्रिल २०२५: देशातील बहुचर्चीत अशा कॉमनवेल्थ घोटाळ्याचा आरोप असलेल्या काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ प्रकरणात क्लीन चीट देण्यात आली आहे. याबाबत आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कलमाडी यांच्या घराबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काल ईडीकडून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आली.
दिल्ली येथे २०१० मध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेची जबाबदारी ही तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांना देण्यात आली होती. या स्पर्धेसाठी विविध प्रकारची कंत्राटे देण्यात आली होती. मात्र स्पर्धेनंतर विरोधकांनी कॉमनवेल्थमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप कलमाडी यांचावर केला होता. सीबीआय आणि ईडीने याबाबत स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली होती आणि या प्रकरणात, सुरेश कलमाडींसह अनेक अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला होता. तब्बल तब्बल १५ वर्षानंतर आता या प्रकरणात कलमाडी यांना दिलासा मिळाला असून काँग्रेसद्वारे कलमाडी यांच्या घराबाहेर जल्लोष करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन आडेकर म्हणाले की, “भगवान के घर देर है, अंधेर नहीं… आज पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे. काल ईडीकडून कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करत आमचे नेते कलमाडी यांना क्लीन चीट देण्यात आले असून सरकारला या १५ वर्षात कोणतेही पुरावे मिळाले नाही. ज्या पद्धतीने भाजप, अण्णा हजारे आणि केजरीवाल यांनी याप्रकरणात आरोप केले होते, ते आता निरर्थक ठरले आहे.”
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार