February 12, 2025

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टॉऊनचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार; अध्यक्षपदी यंदा रोटेरियन अतुल कामत

पिंपरी, २३ जुलै २०२४: रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचा २३व पदग्रहण सोहळा वल्लभनगर येथील कलासागर हॉटेल मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. येत्या रोटरी वर्षासाठी रोटेरियन अतुल कामत यांनी अध्यक्षपदाची आणि रोटेरियन अनिता शर्मा यांनी सचिव पदाची सूत्रे स्वीकारली.

पुणे जिल्ह्याचे रोटरी माजी प्रांतपाल रोटेरियन मोहन पालेशा, उपप्रांतपाल रोटेरियन रोटेरियन शिल्पागौरी, जिल्हा रोट्रॅक्ट प्रतिनिधी रोट्रॅक्टर दृष्टी सिंग, जिल्हा सचिव रोटेरियन विवेक दीक्षित, जिल्हा संचालक रोटेरियन प्रसाद गणपुले, रोटेरियन अजय वाघ, रोटेरियन राम भोसले, पुणे रॉयल रोट्रॅक्ट क्लबचे सचिव रोट्रॅक्टर आर्यन देवणे या बरोबर क्लब आणि जिल्ह्यातील विविध मान्यवर सदस्य उपस्थित होते. मावळत्या अध्यक्षा रोटेरियन प्रतिभा गावडे या देखील उपस्थित होत्या.

पदग्रहण सोहळ्याची सुरुवात अध्यक्ष रोटेरियन कामत यांनी रोटेरियन प्रतिभा गावडे यांच्याकडून स्वतःच्या हाती पदभार घेण्यापासून केली. त्यानंतर कामत यांनी स्वतःचे या वर्षीचे नियोजन सर्व उपस्थित रोटेरियन्स आणि रोट्रॅक्टर्स समोर मांडले. त्यांचा कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळाला. प्रमुख पाहुणे रोटेरियन मोहन पालेशा यांनी अध्यक्ष कामत आणि सचिव अनिता शर्मा याना शुभेच्छा दिल्या.

सचिव रोटेरियन अनिता शर्मा यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन पुणे रॉयलचे रोट्रॅक्टर शैल माताडे यांनी केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे माजी अध्यक्ष रोटेरियन सारंग माताडे आणि डॉ प्रा रोटेरियन अलकनंदा माताडे यांनी केले.