May 15, 2025

एनइसीसी डेक्कन जिमखाना आयटीएफ 75,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती, सहजा यमलापल्ली यांची आगेकूच

पुणे, 28 जानेवारी 2025: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली 24व्या एनइसीसी डेक्कन जिमखाना आयटीएफ 75,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत एकेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती, सहजा यमलापल्ली यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत पहिल्या फेरीत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती हिने अमेरिकेच्या एलाना स्मिथचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. हा सामना 1 तास 20 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये श्रीवल्लीने जोरदार खेळ करत चौथ्या गेममध्ये स्मिथची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखत हा सेट 6-1 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये स्मिथने श्रीवल्लीची तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व 2-1 अशी आघाडी घेतली. पण हि आघाडी तिला फार काळ टिकवता आली नाही. पुढच्याच गेममध्ये श्रीवल्लीने स्मिथची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर श्रीवल्लीने आपल्या बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळाच्या जोरावर हा सेट स्मिथविरुद्ध 6-2 असा जिंकून विजय मिळवला.

संघर्षपूर्ण लढतीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या सहजा यमलापल्लीने क्वालिफायर जपानच्या नाहो सातोचा टायब्रेकमध्ये 6-7(4), 6-1, 6-3 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. सहजा हिने सातोचे आव्हान 2 तास 35 मिनिटात मोडीत काढले. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या चीनच्या फॅंग्रेन टीयान हिने भारताच्या वैष्णवी आडकरचा 6-3, 6-4 असा पराभव केला. अन्य लढतीत इटलीच्या कॅमिला रोसाटेल्लो हिने चेक प्रजासत्ताकच्या सारा बेजलेकचा 3-6, 1-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.

दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या ऋतुजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या ॲलिसिया बार्नेटच्या साथीत तिसऱ्या मानांकित स्लोव्हाकियाच्या दलिला जाकुपोविक व ब्राझीलच्या लॉरा पिगोस्सीचा 6-7(5), 6-4, [10-4] असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.

निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी:
फॅंग्रेन टीयान (चीन)वि.वि.वैष्णवी आडकर(भारत) 6-3, 6-4;
सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि.नाहो सातो (जपान) 6-7(4), 6-1, 6-3;
लॉरा पिगोस्सी [5](ब्राझील)वि.वि.एलेव्हटिना इब्रागिमोव्हा(रशिया) 6-4, 6-0;
टीना नादिन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) वि.वि.एरियाना गीर्लिंग्स (स्पेन) 6-3, 7-6(4);
कॅमिला रोसाटेल्लो (इटली)वि.वि.सारा बेजलेक[2](चेक प्रजासत्ताक) 3-6, 1-6, 6-4;
श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती (भारत)वि.वि.एलाना स्मिथ(अमेरिका)6-1, 6-2;
लिओलिया जीनजीन (फ्रांस) [1]वि.वि.ॲलिस रॉब्बी(फ्रांस)6-1, 6-2;
इरिना श्यामानोविच वि.वि.जरीना दियास (कझाकस्तान)3-6, 6-2, 6-2;
कॅथीन्का वॉन डीचमन[4](लिकटेंस्टाईन)वि.वि.दारिया कुडाशोवा 6-4, 6-3;

दुहेरी: पहिली फेरी:
इडेन सिल्वा (ग्रेट ब्रिटन) /एनास्तेसिया तिखोनोव्हा [1]वि.वि.इनेस इब्बो (अल्जेरिया) /नैमा कारामोको (स्वित्झर्लंड)7-6(6), 6-4;
अलेव्हटीना इब्रागिमोवा /एलेना प्रिडांकिना [4]वि.वि.वैष्णवी आडकर (भारत) /माया राजेश्वरन रेवती (भारत)7-6(6), 6-7(7), [10-7];
डायना मार्सिन्केविका(लात्विया) /नाहो सातो (जपान) वि.वि.झील देसाई (भारत) /प्रांजला यडलापल्ली (भारत)6-2, 6-4;
लीना ग्लुश्को (इस्त्राईल) /अलेक्झांड्रा क्रुनिक (सर्बिया)वि.वि.कॅमिला रोसाटेल्लो (इटली) /पन्ना उदवर्दी (हंगेरी) 2-6, 7-6(7), [10-7]
ॲलिसिया बार्नेट(ग्रेट ब्रिटन) /ऋतुजा भोसले (भारत) वि.वि.दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया) [3] /लॉरा पिगोस्सी(ब्राझील)6-7(5), 6-4, [10-4];
मारिया कोझीरेवा [2] /इरिना श्यामानोविच वि.वि.श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती(भारत) /वैदेही चौधरी (भारत) 6-2, 6-1;
युरिको लिली मियाझाकी(ग्रेट ब्रिटन) /कॅथीन्का वॉन डीचमन(लिकटेंस्टाईन) वि.वि.प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो (इंडोनेशिया) /एलाना स्मिथ(अमेरिका)6-2, 6-4;
ॲलिस रॉब्बी(फ्रांस) /टीना नादिन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)वि.वि.जेसिका फैल्ला(अमेरिका) /एकतेरिना याशिना6-2, 7-6(4)