पुणे, ११ मार्च २०२५: अनाथ आणि निराधार मुलांचे संरक्षण, पुनर्वसन आणि दत्तक घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वर्षे सक्रिय असलेल्या पुण्यातील ‘सोफोश’ या संस्थेला नुकताच महाराष्ट्र सरकारतर्फे ‘सर्वोत्कृष्ट विशेष दत्तक संस्था’ या श्रेणीत प्रतिष्ठित ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे यशवंत चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केल्या गेलेल्या पुरस्कार सोहोळ्यामधे हा पुरस्कार प्रदान आला.
या पुरस्कार सोहोळ्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्री – आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आयोगाच्या अध्यक्षा – सुशीबेन शाह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘सोफोश’ संस्थेचे अध्यक्ष, सी.ए. सचिन अभ्यंकर यांनी हा पुरस्कार संस्थेतर्फे स्वीकारला.
या कार्यक्रमामध्ये बाल संरक्षणात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या अधिकारी आणि संघटनांचा देखील गौरव करण्यात आला.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार