पुणे, १३/०१/२०२५: राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त वारजे मधील पालकत्व फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार 2025 यावर्षी डॉ.मानसिंग साबळे यांच्या मातोश्री सौ बंदरीबाई मंगलसिंग साबळे यांना श्रीमंतराजे राजाभाऊ पासलकर यांच्याहस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
पालकत्व फाउंडेशन तर्फे ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीतून घडवले अशा मातांना मानपत्र सन्मानचिन्ह आणि ग्रंथतुला करून त्यांचा गौरव केला जातो. गेली सहा वर्ष हा उपक्रम चालू असून यावर्षी या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे. सदर कार्यक्रम रविवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वा. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाला.
पालकत्व फाउंडेशन तर्फे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या यशस्वी लोकांच्या एकूण 11 मातांचा राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. त्यामध्ये ससून रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांच्या मातोश्रींना सन्मानीत करण्यात आले आहे.डॉ.साबळे गेल्या अनेक वर्षांपासून ससून हॉस्पिटलच्या माध्यमातुन असंख्य गरीब रुग्णांना वैद्यकिय मदत मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. पुण्यामध्ये गरीब, गरजू रुग्णांसाठी त्यांचे वैद्यकिय क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्यांना आजपर्यंत अनेक संस्थांकडून गौरवण्यात आले आहे. अतिशय ग्रामीण भागातून आणि गरीब परिस्थितीतून, काबाडकष्ट करून मुलांना घडवले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले.आई स्वतः अशिक्षित असुन आपली मुले उच्च शिक्षित झाली पाहिजे, त्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील होत्या आणि त्याचेच फळ म्हणजे डॉ.साबळे गरीब रुग्णांसाठी एक आधार बनले आहेत. त्यासाठी त्यांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्रींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पालकत्व फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम ननवरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर