पुणे: १३/०१/२०२५: सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट च्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले होते.
सदर परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी माननीय खासदार श्री. डेरेक ओ’ब्रायन यांना प्रमुख अतिथी म्हणून व माजी महापौर आणि खासदार श्रीमती वंदना चव्हाण यांना विशेषअतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री. डेरेक ओ’ब्रायन यांनी भारतीय व्यवस्थापन विचार प्रक्रियेबद्दल भाष्य केले व भारतातील महिलांना इतर देशांपेक्षा खूप आधी मतदानाचा अधिकार मिळाला असल्याचे नमूद केले. उच्च शिक्षण क्षेत्रात सिंबायोसिस ने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले तसेच, डॉ. मुजुमदार हे ग्लोबल एज्युकेशन आयकॉन आहेत व त्यांना राज्यसभेवर नामांकित करण्यात यावे अशी इच्छा देखील व्यक्त केली.
वंदना चव्हाण यांनी शाश्वततेचे महत्त्व आणि हवामान बदलाच्या परिणामांबद्दल भाष्य केले.या महत्त्वाच्या मुद्द्यावर जागरूकता निर्माण करण्यासाठी अधिक हरित राजदूतांची आवश्यकता असल्याचे देखील त्या म्हणाल्या.
परिषदेदरम्यान सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व जॉर्ज मेसन विद्यापीठ (GMU), यूएसए यांच्यात डॉ. विद्या येरवडेकर,प्र- कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व डॉ. अजय विंझे, डीन, जीएमयू यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
या परिषदेत जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी (जीएमयू), यूएसए, यूएससीआय युनिव्हर्सिटी, मलेशिया येथील प्रख्यात विद्वानांची प्री-कॉन्फरन्स संशोधन कार्यशाळा होती. जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी – कॉस्टेलो कॉलेज ऑफ बिझनेस हे या परिषदेचे शैक्षणिक भागीदार होते. परिषदेत जीएमयू, अॅस्टन युनिव्हर्सिटी, यूके आणि यूएससीआय युनिव्हर्सिटी, मलेशिया येथील प्रख्यात विद्वानांनी आपला सहभाग नोंदवला.
डॉ. श्रीरंग अल्टेकर, संचालक, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे यांनी उद्घाटनपर भाषण केले. डॉ. विद्या येरवडेकर,प्र- कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांनी स्वागतपर भाषण केले व डॉ. आर. रमण, कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांनी आभार प्रदर्शन केले.
More Stories
पुणे: आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात…विद्यार्थ्यांचे औक्षण करून,साखर वाटून स्वागत
पुणे: राज्याचे माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण
अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….