पुणे, 14 सप्टेंबर 2025: रोटरी क्लब ऑफ पिंपळे सौदागर यांच्या वतीने रामा ग्रुप यांच्या संलग्नतेने आयोजित रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मौसम माने पाटील, पूर्वा मुंडळे, अगस्त्य तितार, निरंजन मंत्री यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच कायम राखली.
एसीई अरेना स्पोर्ट्स लँड आहेर नगर वाल्हेकर वाडी चिंचवड व ग्रॅव्हिटी पुनावळे या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत पूर्वा मुंडळेने अव्वल मानांकित भक्ती पाटीलचा 15-06, 15-11 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. बिगर मानांकित मौसम माने पाटीलने दुसऱ्या मानांकित एस दखणेचा 11-15, 15-07, 15-07 दिमाखात उपांत्य फेरी गाठली. 9 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत विवान बर्नवालने प्रयाण महाशब्देचा 15-07, 16-14 असा तर, अगस्त्य तितारने दुसऱ्या मानांकित केविन टिर्कीचा 15-08, 15-13 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
19 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित नेहा भिसेने तिसऱ्या मानांकित लारण्या नलावडेवर 15-03,17-15 असा विजय मिळवला. चौथ्या मानांकित एस दखणे हिने शिवांजली कर्डिलेला 15-08, 19-17 असे पराभूत केले. ५० वर्षांवरील पुरूष गटात उपांत्य फेरीत निरंजन मंत्रीने ससिकुमार अय्यरचा 09-15, 15-07, 15-10 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
निकाल: 9 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
विवान बर्नवाल वि.वि.प्रयाण महाशब्दे 15-07, 16-14;
अगस्त्य तितार वि.वि.केविन टिर्की[2] 15-08, 15-13;
13 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
सनाया निर्मल[3] वि.वि.स्वरा जाधव[7] 15-09, 15-12;
शौर्यतेजा पवार[4] वि.वि.कृतिका देशमुख[5] 15-01, 15-12;
शनाया राजवाडे वि.वि.आराध्या जोशी[8] 15-10, 15-12;
17 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
अनय एकबोटे[1] वि.वि.श्रावण देशमुख 18-16, 15-07;
वत्सल तिवारी[6] वि.वि.नचिकेत गोखले[4] 12-15, 15-08, 15-05;
ईशान लागू वि.वि.भाव्यांश कुमार 15-06, 15-05;
अवनीश बांगर वि.वि.अर्णव बाफना[8] 15-06, 15-10;
17 वर्षांखालील मुली:
पूर्वा मुंडळे वि.वि. भक्ती पाटील[1] 15-06, 15-11;
हृदय साळवी वि.वि. श्रावणी आर्डे 15-08, 07-15, 15-10;
मौसम माने पाटील वि.वि. एस दखणे[2] 11-15, 15-07, 15-07;
19 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
असीम श्रोत्रिया[6] वि.वि. ध्रुव समुद्र 15-09, 15-09;
19 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
एस दखणे[4] वि.वि.शिवांजली कर्डिले 15-08, 19-17;
नेहा भिसे वि.वि.लारण्या नलावडे[3] 15-03,17-15;
भक्ती पाटील[2] वि.वि.परिधी बुधवार 15-12, 15-10;
50 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
संतोष ढोरे[1]वि.वि.आनंद कृष्णमूर्ती 15-08, 08-15, 16-14;
निरंजन मंत्री वि.वि.ससिकुमार अय्यर 09-15, 15-07, 15-10.
More Stories
जुन्नरमध्ये आशासेविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; ३६५ आशासेविकांची तपासणी
गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे -पोलीस आयुक्त अमितेश कुमार
‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून दीड कोटीहून अधिक रुपयांची तडजोड-सोनल पाटील