पुणे, दि. २५ ऑगस्ट २०२३- पूना क्लब लिमिटेड यांच्या वतीने आयोजित पूना क्लब फिटनेस लीग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मिशन इम्पॉसिबल आणि स्पेशल २७ या संघांनी अनुक्रमे ए आणि बी गटात आघाडीचे स्थान मिळविले. पूना क्लबच्या १७५ सभासदांनी दोन गटांमधील एकूण १० संघांमधून या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
अॅथलाईट स्पोर्टस अॅकॅडमी व इलिसियम क्लब, फ्लोअर वर्क्स, रूबी हॉल क्लिनिक, सोलब्युल आणि सुराणा ट्रेडर्स यांनीप्रायोजित केलेल्या या स्पर्धेत टीम किंग्ज आणि आयोग वेलनेस यांनी अनुक्रमे ए व बी गटात दुसरा क्रमांक राखला.
ए गटात मिशन इम्पॉसिबल संघ १९८ गुणांसह आघाडीवर आहे. त्यांनी मस्क्युलर स्ट्रेंग्थमध्ये २३ गुण, मस्क्युलर एन्ड्युरन्समध्ये ३३ गुण, कार्डिओ गटात ३२ गुण, क्रॉसफिट गटात २६ गुण, तर किड्स गटात ४ गुणांची कमाई केली.
याच गटात किंग्ज संघ ११३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी मस्क्युलर स्ट्रेंग्थमध्ये ११ गुण, मस्क्युलर एन्ड्युरन्समध्ये ४१ गुण, कार्डिओ गटात ३१ गुण, क्रॉसफिट गटात २५ गुण, तर किड्स गटात ५ गुणांची कमाई केली.
बी गटात स्पेशल २७ संघ ११० गुणांसह आघाडीवर आहे. त्यांनी मस्क्युलर स्ट्रेंग्थमध्ये ३३ गुण, मस्क्युलर एन्ड्युरन्समध्ये ३० गुण, कार्डिओ गटात ३० गुण, क्रॉसफिट गटात १६ गुण, तर किड्स गटात १ गुणांची कमाई केली.
याच गटात आयोग वेलनेस संघ ९६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी मस्क्युलर स्ट्रेंग्थमध्ये ३० गुण, मस्क्युलर एन्ड्युरन्समध्ये २० गुण, कार्डिओ गटात २४ गुण, क्रॉसफिट गटात १७ गुण, तर किड्स गटात ५ गुणांची कमाई केली.

More Stories
एफएचएस होलिस्टिको रन स्पर्धेत अमित पाटील, नीता सलामे, अरविंद यादव, शकीला वसावे यांना विजेतेपद
गिरिप्रेमीतर्फे सर्व महिला माऊंट मेंन्टॉक कांग्री-II मोहिमेच्या सदस्यांचा सन्मान
विनायकी क्रीडा महोत्सवानिमित्त खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत 250खेळाडू सहभागी